उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  पंढरपूर येथील  साप्ताहिक जोशाबा टाइम्स यांच्या वतीने कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस पुरस्कार दिले जातात. त्यातील साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असले बाबत पंडित कांबळे यांना  पंढरपुर येथील श्री विठ्ठल ईन सभागृहात लोकशाही राष्ट्रवादी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट रावसाहेब मोहन यांच्या हस्ते पंडित कांबळे व त्यांची पत्नी लीना कांबळे यांचा शाल सन्मानपत्र सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सद्भावना पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.

 यावेळी रिपाई उपसंपादक विलास जगदने सर, कार्यकारी संपादक, डॉक्टर रामदास नाईक नवरे व इतर सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनबा वाघमारे यांनी केले. प्रास्ताविक संपादक विलास जगधने सर यांनी केले तर आभार श्रीकांत कसबे यांनी मानले.

 
Top