परंडा / प्रतिनिधी- 

 महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कार्यालय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण उस्मानाबाद यांच्या संदर्भीय पत्रानुसार नशा मुक्त भारत अभियांतर्गत शपथ घेण्यात आली.आरोग्य स्वस्थ राहण्यासाठी मानसिक आचरण महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन उपजिल्हा रुग्णालय परांडा येथील समुपदेशक अमोल वांबुरकर यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे आयोजित केलेल्या जागतिक युवा दिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव ,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे, आयक्यूएसी चेअरमन डॉ महेश कुमार माने, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ विशाल जाधव तसेच उपजिल्हा रुग्णालय परांडा येथील तानाजी गुंजाळ, अजय जाधव, इम्रान शेख आदी उपस्थित होते.

     महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग राष्ट्रीय सेवा योजना विभाग उपजिल्हा रुग्णालय परांडा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. डॉ निलोफर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तानाजी गुंजाळ यांनी आरोग्य विषयक महत्वपूर्ण टिप्स दिल्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक सचिन साबळे प्रा डॉक्टर कृष्णा परभने यांनी सहकार्य केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्राध्यापक डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार  प्रा अमर गोरेपाटील यांनी मानले.


 
Top