परंडा / प्रतिनिधी -

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भविष्याचा विचार करून जीवन उज्वल करावे असे प्रतिपादन परंडा पोलीस ठाणे येथील सहायक पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या अँटी रॅगिंग मार्गदर्शन कार्यक्रमात केले. महाविद्यालयांमध्ये अँटी रॅगिंग समितीच्या वतीने  मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्याते म्हणून कविता मुसळे उपस्थित होत्या. 

पुढे बोलताना कविता मुसळे म्हणाल्या की सध्या समाजामध्ये चोरी डाका किंवा क्राईम सारखे अनेक प्रकार करतात त्यामध्ये अनेक तरुण अडकले जातात आणि त्यांच्या आयुष्यामधील ध्येयधोरणे तिथेच थांबतात तेव्हा दूरदृष्टी समोर ठेवून आपल्या आयुष्याची वाटचाल करावी .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ सुनील जाधव हे उपस्थित होते तर व्यासपीठावर अँटी रॅगिंग समितीचे चेअरमन डॉ शहाजी चंदनशिवे, आयक्यूएसीचे चेअरमन डॉ महेशकुमार माने, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ विशाल जाधव उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष समारोप करताना प्राचार्य डॉ सुनील जाधव म्हणाले की शाळा महाविद्यालय हे संस्काराचे केंद्रस्थान आहे या महाविद्यालयात शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर जीवनात यशस्वी कसे व्हावे याचे धडे दिले जातात ते विद्यार्थ्यांनी आत्मसात करून स्वतःचे जीवन उज्वल करावे. रॅगिंग सारखे प्रकार आपल्या महाविद्यालयात होत नाहीत ही अभिमानाची गोष्ट आहे.

    कार्यक्रमाचे आयोजन समिती मधील सदस्य प्रा डॉ संतोष काळे, प्रा डॉ प्रशांत गायकवाड, प्रा जगन्नाथ माळी,  प्रा बी वाय माने, प्रा डॉ अरुण खर्डे यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार डॉ प्रशांत गायकवाड यांनी मानले.


 
Top