लोहारा/प्रतिनिधी

 लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात वाणिज्य विभागामार्फत आयोजित ‘ युवकांचे  सक्षमीकरण  व देश उभारणी मध्ये कौशल्य व उद्योजकता विकासाची भूमिका ‘ (द रोल ऑफ स्किल अँड आंत्रप्रिनर्शिप डेव्हलपमेंट फॉर युथ एम्पॉवरमेंट अँड नेशन बिल्डींग ) या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या रिसर्च जर्नलचे उद्घाटन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश   चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. 

याप्रसंगी प्राचार्य डॉ. स्वाती यादव, प्राचार्य डॉ. विनायक पाटील, प्रा. शेख सबिहा मॅडम, प्रा. प्रमोद हुक्केरी,  प्रा. कपिल चव्हाण, प्रा. विकास पाटील, प्रा. कदम सर, प्रा. डॉ. मुंडे सर, डॉ. संजय बिराजदार , प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर  इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच याप्रसंगी लोहारा तालुक्यातील सर्व प्रमुख पत्रकार व प्राध्यापक वर्ग यांची उपस्थिती होती.

 
Top