उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जाणीव संघटना वंचित विकास संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी येथे  जाणीव संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ लगाडे यांनी व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम घेतला. यावेळी छत्रपती शिवाजी विद्यालय च्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. व्ही. गाढवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या .

यावेळी कु. वैष्णवी परमेश्वर तुंदारे  जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम आल्यामुळे यांचा सत्कार रामभाऊ लगाडे यांच्या हस्ते करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयावर जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकली होती यानंतर मुख्याध्यापिका एस व्ही गाढवे यांच्या हस्ते कू.अनुजा सचिन छबिले घोषवाक्य स्पर्धा तृतीय जिल्हास्तरीयावर आल्यामुळे तिचा सत्कार करण्यात आला. यानंतर युवक युती किशोर किशोरी मुला मुलींचे प्रश्न यावर रामभाऊ लगाडे यांनी मार्गदर्शन केले .यानंतर त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून वकृत्व स्पर्धा नेतृत्व कौशल्य यावर अभिरुची वर्ग घेऊन कार्यक्रम खेळ गाणी गोष्टी यातून अंधश्रद्धा निर्मूलन संवाद कौशल्य व्यक्तीमहत्व विकास यावर मार्गदर्शन केले यानंतर अध्यक्षीय समारोप एस व्ही गाढवे यांनी केले .यावेळी बापूसाहेब सावंत यांनीही मार्गदर्शन केले सूत्रसंचालन एस बी छबिले यांनी केले आभार एस एस धारकर यांनी मानले यावेळी 900 मुलं मुली व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या कार्यक्रम उत्साहात पार पाडला .                             

 
Top