मुरुम/प्रतिनिधी

श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६४ वा वर्धापन व्याख्यानाने उत्साहात साजरा करण्यात आला. 

प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व  कै. माधवराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.    यावेळी व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती आणि विचार या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. सतिश शेळके, डॉ. राम बजगिरे, डॉ. शिवपुत्र कानडे, डॉ. भिलसिंग जाधव, डॉ. विनायक रासुरे, डॉ. सुधीर पंचगल्ले आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. डॉ. अरुण बाबा यांनी मानले. याप्रसंगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

 
Top