तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तालुक्यातील नळदुर्ग, जळकोट, नंदगाव,विभागात संततधार पावसामुळे सोयाबीनसह अन्य पिकांचे ‌मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.

जळकोट,नळदुर्ग,विभागातील आलियाबाद, रामतीर्थ,येडोळा, जळकोट,हंगरगा (नळ) ,बोरगाव,नंदगाव लोहगाव,जळकोटवाडी, मुर्टा , होर्टी, चिकुंद्रा, मानमोडी आदी परिसरात गेल्या तीन चार दिवसांपासून संततधार पाऊस चालू आहे.त्यामुळे शेतात पाणी साचून पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने शासनाने तात्काळ सरसकट आथिर्क मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य तथा माजी सभापती प्रकाश चव्हाण यांनी केली आहे.

आज आलिया बाद शिवारात पंचनामे करण्यात आले .यावेळी कृषी सहायक एस.आर.माने, पोलीस पाटील शिवाजी चव्हाण, विनायक चव्हाण, देविदास चव्हाण, मोतीराम राठोड,सिद्राम पवार, यशवंत राठोड, माणिक राठोड,विक्रम चव्हाण, धोंडीराम चव्हाण, संदीप राठोड आदि शेतकरी उपस्थित होते.

 
Top