तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ  तुळजापूरच्या घाटशिळ पायथ्याशी असणाऱ्या श्रीमुदगुलेश्वर मंदीरातील  श्रीशंभुमहादेव मुतीस  नागपंचमी   निमित्ताने  मंगळवार दि.२रोजी  संपुर्ण गाभारासह शंभुमहादेव  महादेव मुर्तीस अकरा हजार पानांचा आरास करण्यात आला होती.यात महादेव पिंडीवर  नागफणा उभारुन त्यावर ब्रम्ह कमळ ठेवण्यात आले होते .नागरुपातील श्रीमुदगुलेश्वर देवता पाहून भाविक धन्य धन्य होत होता .

मंगळवारी श्रीमुदगुलेश्वर परिसरातील असणाऱ्या नागदेवता मुर्तीचे पुजन करुन श्रीमुदगुलेश्वर चे दर्शन भाविक घेत होते .दिवासभर भाविक भक्तांनी मंदीर परिसर गजबजुन गेला होता


 
Top