मुरूम/ प्रतिनिधी-

येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठीचा २०२२-२३ साठीचा रोलर पूजनाचा कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि.७) संपन्न झाला.

यंदाच्या हंगामात कारखान्याचे ६ मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. यासाठी लागणारी ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा, मशिनरी ओव्हरहॉलिंगसह दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. अनेक अडथळ्यांवर मात करत कारखान्याची वाटचाल चालु आहे. येणारा गळीत हंगाम योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने सर्व संचालक मंडळ व आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील, कारखान्याचे व्हाइस चेअरमन सादिकमियाँ काझी, विजयकुमार सोनवणे, माजी साखर आयुक्त डी. आय. गायकवाड, कारखान्याचे संचालक केशव पवार, विठ्ठलराव पाटील, दिलीप भालेराव, शिवलिंग माळी, माणिक राठोड, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, मुरूम सोसायटीचे चेअरमन दत्ता चटगे, नानाराव भोसले, विकास हराळकर, देवेंद्र कंटेकूरे, युसूफ मुल्ला, माजी नगराध्यक्ष प्रदीप दिंडेगावे, बबन बनसोडे, गोविंद पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथणी, चिफ इंजिनिअर ए. एल. अष्टेकर, चिफ केमिस्ट एस. बी. गायकवाड, मुख्य शेतकी अधिकारी ए. बी. राखेलकर, कार्यालयीन अधीक्षक के. एम. चौगुले, सर्व अधिकारी, कामगार, कर्मचारी उपस्थित होते.

 
Top