तेर / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरातील ओवरीचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी तेरचे माजी सरपंच महादेव खटावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

श्री संत गोरोबा काका मंदिर परिसर विकास आराखडा मधून उत्तर बाजूची ओवरी बांधकामास ग्रामविकास अंतर्गत जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या माफऺत चार वर्षापासून दोन कोटी रुपयाचे अंदाजपत्रक असलेले काम अपूर्ण आहे.फरशी व रंगकाम पूर्ण होत नसल्याने भाविकांना त्रास होत आहे.एका वर्षात पूर्ण होणारे काम चार वर्षांत पूर्ण होत नाही.याची चौकशी करून संबंधित गुत्तेदार व अधिकारी यांना सूचना देऊन काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी तेरचे माजी सरपंच महादेव खटावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


 
Top