परंडा /प्रातिनिधी : - 

मराठा आरक्षण लढ्यातील अग्रणी आणि शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार विनायकजी मेटे यांचा आज पहाटे मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर अपघाती निधन झाल्याने 

मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांनी त्यांच्या संवाद निवासस्थानी शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.   मेटे यांचे निधन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे.राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अविस्मरणीय,उल्लेखनीय होते.त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो यासाठी मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांनी संवाद निवासस्थानी शोक व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

   यावेळी शोक सभेत परंडा शवर व तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top