तुळजापूर  / प्रतिनिधी-

येथील श्री संत सेना महाराज नाभिक समाज सेवा मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे संत शिरोमणी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा  रक्तदान शिबीर व डॉ.ह.भ.प. जितेंद्र डोलारे महाराज यांची कीर्तनसेवा  घेवुन साजरा  उत्साहात साजरा करण्यात आला.

 सराया धर्मशाळा येथे तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या उपस्थितीत श्री संत सेना महाराज मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम पार पडला. नंतर   डॉ.ह.भ.प. जितेंद्र डोलारे महाराज यांची कीर्तनसेवा पार पडली.तसेच यावेळी  नाभिक बांधवांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यात ९१ रक्तदात्यांनि  रक्तदान  केले. 

 कार्यक्रमास माजी गटशिक्षणाधिकारी अरविंद चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी मल्लिनाथ काळे,विनोद गंगणे आनंद  कंदले, जेष्ठ पत्रकार आंबादास पोफळे,श्रीकांत कदम,सचिन ताकमोघे यांच्यासह मोठ्या संख्येने नाभिक समाज बांधवांच्या उपस्थितीत होते. 


 
Top