उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहारातील नुतन विद्यामंदिरात  जिल्हा संस्कार भारती ,आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नुतन विद्यामंदिर , श्रीपतराव भोसले विद्यालय व संस्कृती प्रतिष्ठाण उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी प्रमाणे पर्यावरणपूरक गणेश मुर्ती स्पर्धा २०२२ संपन्न झाली.

 सरस्वती प्रतिमा पुजनासह मान्यवरांच्या स्वागतानंतर  कलाध्यापक शेषनाथ वाघ यांनी गणेश मुर्ती कशी तयार करावी यांचे प्रात्याक्षिकरुपी दाखविले त्यानंतर स्पर्धेस सुरुवात झाली एकूण २०० विद्यार्थी  स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून आकर्षक गणेश मुर्ती साकारल्या या स्पर्धेचे परिक्षक म्हणून धनंजय जेवळीकर यांनी पाहिले या स्पर्धेत बक्षीसपात्र स्पर्धकास बक्षीस आयोजित सभारंभात वितरण लवकरच केले जाईल असे आयोजकाच्या वतीने सांगितले. 

या स्पर्धेसाठी जिल्हा संस्कार भारती समिती जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी , संस्कृती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राम दशरथ मुंडे, जिल्हा मार्गदर्शक शेषनाथ वाघ, शहर संयोजन अध्यक्ष शरद वडगावकर, नुतन विद्यामंदिर मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे, श्रीपतराव भोसले विद्यालयचे पर्यवेक्षक राजेंद्र जाधव , मुकुंद पाटील-मेंढेकर , महादेव केसकर, धनंजय कुलकर्णी , अरविंद पाटील, शिक्षक संतोष माळी, दिपक केंगार ,सुरज सपाटे, स्वंयसेवक सत्यहरी वाघ आदि शिक्षक- शिक्षकेत्तर परीश्रम घेतले. सुत्रसंचालन शिक्षीका देशमुख यांनी केले.


 
Top