परंडा / प्रतिनिधी :- 

महाराष्ट्राच्या स्वातंत्र्या नंतर प्रथमच परंडा - भूम - वाशी मतदार संघाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रा.तानाजी सावंत यांची राज्याच्या कॅबीनेट मंत्री पदी निवड झाल्याने सावंत समर्था कडून येथील शिवाजी चौकात फटाके फोडून, गुलाल उधळून, पेढे वाटून आनंदोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.

  यावेळी जि.प.चे मा.गटनेते दत्ता (आण्णा ) साळुंके, तालुका प्रमुख आण्णा जाधव, शहरप्रमुख बाळू गायकवाड मा.नगर सेवक रत्नकांत शिंदे,सतीश मेहेर आदींसह शहर व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top