तुळजापूर / प्रतिनिधी :- 

तालुक्यातील जवळगा (मेसाई) (ह.मु. तुळजापूर) येथील दयानंद दत्तू खबोले हे लष्कराचे जवान तब्बल २२ वर्षाच्या दीर्घ सेवेनंतर काश्मीर येथुन सेवानिवृत्त झाले असून त्यांचे व त्यांच्या सोबतचे संभाजी मोहन कदम भानसगावं (ता.उस्मानाबाद),शंकर जाधव कसेगाव (उळे) ता.दक्षिण सोलापूर,दत्ता नवगिरे तुळजापूर,गजानन ठाकरे राळेगाव (यवतमाळ),उमेश भुरुगे परंडा,मारुती यादव लातूर या लष्कर जवानाचे तुळजापूर येथे तुळजाई परिवार व खबोले परिवार यांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आलाण्

        तुळजापूर येथील भावसार भक्त निवास व मंगल कार्यालय येथे दि.३१ रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजाई पतसंस्था चेअरमन राजाभाऊ देशमाने होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक पंडितराव जगदाळे,मजदूर फाउंडेशन चेअरमन नारायण नन्नवरे,राजाभाऊ साळुंके,जगन्नाथ नरवडे,पत्रकार संजय खुरुद यांची उपस्थिती होती. तसेच  विकास मलबा,अँड.बालाजी देशमाने, महालिंग राऊत,गुरुलिंग राऊत,गौरीशकर देशमाने,ज्ञानेश्वर घोडके,सुरज देशमाने, रामेश्वर उबरे तसेच तुळजाई परिवार सदस्य शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन राऊत यांनी तर आभार प्रदर्शन दिपक खबोले यांनी केले.


 
Top