उमरगा/ प्रतिनिधी-

 तालुक्यातील नारंगवाडी व पेठसांगवी ग्रामपंचायत कार्यालयात पंचायत समिती उमरगा व प्रथम एज्युकेशन फौंउडेशन मुंबई शाखा किल्लारी तर्फे रोजगार मेळावा घेण्यात आला, या मेळाव्यात दोन्ही गावातील 65  सुशिक्षीत बेरोजगार युवक व युवतींनी नावं नोंदणी केली आहे.

 रोजगार मेळाव्यासाठी . गटविकास अधिकारी श्री कुलदीप कांबळे याचे आदेशाने नारंगवाडीचे ग्रामसेवक जगदीश जाधव,सरपंच सौ कविता ताई चव्हाण, श्री राजेंद्र चव्हाण तसेच पेठसांगवीचे ग्रामसेवक गुंडेराव, कासार सरपंच सौ सुमन ताई सुभेदार ,श्री धनराज सुभेदार प्रथम संस्थेचे विभागप्रमुख सदाशिव साबळे, संपर्क अधिकारी सुमीत कोथिंबिरे यांनी युवकांना मार्गदर्शन केले,

हा मेळावा यशस्वी करणेसाठी ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण जकेकुरे ग्रामपंचायत कर्मचारी गणेश कोकाटे, नागेश स्वामी, श्रीहरी गायकवाड ,ट्रेनर दिनेश धुळे, तुषार निनादकर, मेंटर लक्ष्मण मंडले यांनी परिश्रम घेतले.


 
Top