उस्मानाबाद / प्रतिनिधी-
रूपामाता मल्टीस्टेट कॉ.ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.उस्मानाबादचे स्वत:च्या मालकीचे आॅफिस असून अल्पावधीतच संस्थेच्या नावे स्व:मालकीची मालमत्ता उभारलेली आहे. हेतु शुध्द असेल तर संस्था नावारूपाला येण्यास वेळ लागत नाही, असे प्रतिपादन रूपामाता उद्योग समूहाचे अध्यक्ष अॅड. व्यंकटराव गुंड यांनी केले.
रूपामाता मल्टीस्टेट कॉ.क्रेडीट सोसायटीच्या ९ व्या वर्धापन दिनानििमत्त सुनिल प्लाजा मधील रूपामाताच्या मुख्य शाखेत हा कार्यक्रम झाला. यावेळी अॅड. गुंड बोलत होते. यावेळी श्री. संजय पटवारी, राजाभाऊ वैद्य, शंकरराव गाडे, प्रकाश गरड, अॅड. शरद गुंड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. महिला बचत गटाच्या वतीने रूपाबाई गुंड यांच्या प्रतिमेची पुजा करून दीप प्रज्वलन करण्यात आले. पुढे बोलताना रूपामाताचे अध्यक्ष अॅड. गुंड म्हणाले की, भाड्याच्या खोलीमध्ये रूपामाता मल्टीस्टेटचे छोटे रूप लावले होते. त्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत आहे. रूपामाता उद्योग समुहाच्या वतीने अनेकांना काम, अनेकांना आर्थिक स्वरूपात मदतीचा हाथ देताना एक आत्मीक समाधान लागते, असे सांगून अॅड. गुंड यांनी आपण प्रत्येक्ष काम करणाऱ्या शेतकरी आई-वडीलाचा मुलगा असून मोठ-मोठे नेते ज्या प्रमाणे सांगतात. त्याप्रमाणे नाममात्र शेतकऱ्याचा मुलगा आपण नाही. त्यामुळेच आपली भावना प्रामाणीक आहे. त्यामुळेच रूपामाता उद्योग समुहातील सर्व संस्थांना यश मिळत आहे. आज आनेक सहकारातील संस्था बुडत असताना रूपामाताचे यश हे निश्चित आधोरेखीत होते, असे ही त्यांनी सांगितले. यावेळी रूपामाताचे सीईओ मिलींद खांडेकर यांनी आपल्या प्रास्ताविकेत संस्थेचा चढता आलेख असून महिला बचत गट व महिलांसाठी विशेष योजना राबविल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सतीश लांडगे यांनी केले. कार्यक्रमास रूपामाताचे सर व्यवस्थापक खडके, गोपाळ जंगाले, पवनराजे मल्टीस्टेटचे मुकीम सिध्दकी,आर्यसिध्दीचे अधिकारी शोभा पाटील, यशोधाचे प्रकाश गरड, संदीपान गुंड, श्रीमती शेख, सरपंच कांबळे गुरूजी, कास्ते, वाघमारे व महिला बचत गट आदी उपस्थित होते.