तेर / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर -जागजी रस्त्यांची जागोजागी खड्डे पडले असल्याने दुरवस्था झाली असून नागरिकांना व वाहान धारकांना प्रचंड त्रास सहन करत प्रवास करावा लागत आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर -जागजी रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असून या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून जागोजागी खड्ड्यात पाऊसाचे पाणी साठत असल्याने नागरिकांना व वाहान धारकांना रस्त्यावरील खड्डे चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने तेर- जागजी रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरीकातून होतं आहे.

 
Top