उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील वाणिज्य विभागात शिकत असलेली स्वप्नाली मगर हिने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 2020-21 या वर्षी घेण्यात आलेल्या विद्यापीठ परीक्षेमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या कडून तिचे आणि वाणिज्य विभागाचे अभिनंदन करण्यात आले.रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाची सुवर्णपदकाची परंपरा कायम ठेवली. अशीच कायम राहावी अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

या विद्यार्थिनीला प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख वाणिज्य विभागातील प्रा.नारायण सकटे,प्रा.बालाजी नगरे, डॉ.अवधुत नवले, डॉ. अमर निंबाळकर, प्रा.सुप्रिया शेटे त्याचबरोबर वाणिज्य विभागात कार्यरत असणाऱ्या सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन लाभले. स्वप्नाली मगर या विद्यार्थिनीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 
Top