उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 64 वा वर्धापन दिन दि. 23 ऑगस्ट 2022 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि विद्यापीठ ध्वज फडकावून व विद्यापीठ गीत गाऊन वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख आणि वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.

    सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.


 
Top