परंडा / प्रतिनिधी : -

 तालुक्यातील सिना - कोळेगाव प्रकल्पानंतर सर्वात मोठा असणारा हा चांदणी प्रकल्प आज मंगळवार दिनांक ९ रोजी सकाळी नऊच्या दरम्यान चांदणी धरण १०० टक्के ओव्हर फ्लो होऊन सांडव्या द्वारे पाणी वाहत आहेत.

 गेल्या पंधरा-वीस दिवसापासून चांदणी धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे बार्शी तालुक्याचा पश्चिमेकडील भाग, भूम तालुक्याचा पूर्व दक्षिण भाग, वाशी तालुक्याच्या काही भागात होत असणाऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे चांदणी धरण यावर्षी लवकरच भरले आहे.

शक्यतो आपल्या भागातील परंडा तालुक्यातील धरणे ही परतीच्या पावसावर भरत असतात परंतु यावर्षी मात्र हे चांदणे धरण सुरुवातीच्याच पावसावर भरल्यामुळे शेतकऱ्यात मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त होत आहे, परंडा तालुक्यातील पहिले धरण शंभर टक्के भरण्याचा मान हा चांदणी धरणाला मिळाला, चांदणी धरणाची क्षमता २३.७८ दशलक्ष घनमीटर एवढी साठवण क्षमता असणारे हे धरण जवळजवळ ३०००० ते ३१०० हेक्टर जमीन ओलिताखाली या धरणामुळे येत असून दहा गावे लाभक्षेत्र या धरणामुळे आहे, बार्शी शहर व बार्शी ग्रामीण पाणीपुरवठा चांदणी धरणांमधून केला जातो या धरणाच्या परिसरात ऊस हे प्रमुख पीक असून मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जाते.

चांदणी धरणावर मासे व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. यात प्रामुख्याने रहू, मिरगल, सुपरनेस, कटला, वाम, मरळ, कोळंबी ,अशा प्रकारच्या माशांच्या विविध जाती या ठिकाणी या धरणात आढळून येतात.

विशेष म्हणजे तालुक्यात एकमेव असणारे या धरणाचे दरवाजे हे स्वयंचलित असून आपोआप पडतात व पाण्याचा स्पीड कमी झाल्यानंतर आपोआप उठतात हे या धरणाचे वैशिष्ट्य आहे. चांदणी धरण १००% टक्के भरल्याने परिसरातील शेतकऱ्यातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.


 
Top