उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 स्थानिक गुन्हे शाखेच्या सपोनि शैलेश पवार यांना  गोपनीय खबर मिळाली की, उस्मानाबाद शहरातील सांजा चौक रस्त्याजवळील विद्यामाता इंग्लीश स्कुलच्या पाठीमागे श्रीकांत डोके यांच्या पत्रा शेडमध्ये काही ईसम जुगार खेळत आहेत. यावर स्था.गु.शा. च्या पथकाने नमूद ठिकाणी 18.30 वा. सु. नमूद ठिकाणी छापा टाकला असता तेथे  श्रीकांत डोक, नितीन वडवल, रमन जाध, अझहरोद्दीन शेख, सचिन राऊत, स्वप्नील शिंद, एजाज शेख.अरविंद गोरे , अहमद शेख, संपत शेरखाने, महादेव वाडकर , गोविंद चव्हाण, सर्व रा. उस्मानाबाद हे सर्व लोक तिरट नावाचा जुगार खेळत असताना आढळले. त्यांच्याकडून जुगार साहित्यासह 2 चारचाकी वाहने, 6 दुचाकी वाहने, 12 भ्रमणध्वनी व रोख रक्कम असा एकुण 21,08,950 ₹ चा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 4,5 अंतर्गत उस्मानाबाद (श.) पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

  सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोनि- रामेश्वर खनाळ, सपोनि- शैलेश पवार, पोहेका- विक्रम माने, हुसेन सय्यद, पोना- अमोल चव्हाण, पोकॉ- रविंद्र आरसेवाड, योगेश कोळी, साईनाथ आशमोड, सहाने यांच्या पथकाने केली आहे.


 
Top