उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 तामलवाडी पोलीस ठाण्याचे पथक पो.ठा. हद्दीतील अवैध मद्य विरोधी कारवाई साठी   गस्तीस होते. दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने 10 वा. सु. तुळजापूर तालुक्यातील लमाण तांडा, खडकी माळरानात गावठी दारु निर्मीतीच्या अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी तेथे मुळेगाव तांडा ग्रामस्थ- अशोक राठोड हे गावठी दारु निर्मीती करताना आढळले. घटनास्थळी गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रणाचा एकुण 1,300 लिटर आंबवलेला द्रव हा लोखंडी पिंपांत आढळला. तसेच 100 लि. गावठी दारु असा एकुण अंदाजे 47,000 ₹ किंमतीचा माल आढळला. यातील गावठी दारु निर्मीतीचा द्रव पदार्थ हा नाशवंत असल्याने पथकाने तो जागीच ओतून नष्ट करुन मद्य जप्त केले. यावर नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत तामलवाडी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

  सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन तामलवाडी पो.ठा. चे सपोनि-  सचिन पंडीत यांसह पथकाने केली आहे.


 
Top