उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

ठाकरेसेनेला कोल्हापूरचा महापूर आठवतोय उस्मानाबाद जिल्ह्यात वाहून गेलेल्या सोयाबीनच्या गंजी आठवतात का ?, सवाल भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी उपस्थित केला. 

ठाकरेसेनेच्या मोदी लाटेवर निवडून आलेल्या प्रतिनिधीना सध्या शेतकऱ्यांची प्रचंड चिंता सतावत आहे, शेतकऱ्यांच्या चिंतेत त्यांनी एक प्रेसनोट काढून कोल्हापूरच्या धर्तीवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

 शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालीच पाहिजे यात दुमत नाही मात्र ज्या कोल्हापूरच्या महापुराचे दाखले सेनेच्या प्रतिनिधीकडून दिले जात आहेत त्या कोल्हापुरात आलेल्या महापुराची परिस्थिती व 2021 या वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यात निर्माण झालेली महापुराची दुरवस्था एकसारखीच होती परंतु त्याची आर्थिक मदत उस्मानाबादच्या शेतकऱ्यांना मिळवून देण्यात सेनेचे जिल्ह्यातील दोघे प्रतिनिधी सपशेल अपयशी ठरले होते...याचा त्यांना विसर पडलेला दिसतो.


 
Top