उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कंमाडो परिवार संचलित यशवंत शैक्षणिक समितीच्या वतीने धनगर समाजातील मार्च २०२२ १० १२ वी च्या बोर्ड परिक्षेत अत्यंत उप संपादन केलेल्या गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार रविवार दि. २१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ठीक १०.०० वा. हिराचंद नेमचंद वाचनालयाचे किलोस्कर सभागृह, सोलापूर येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा.श्रीमता तेजस्वी सातपुते (भा.पो.से.) पोलीस अधिक्षक, सोलापूर तर अध्यक्ष म्हणून मा. प्राचार्य डॉ. श्री. राजेंद्र शेंडगे, ओ. आर. बुल महिला महाविद्यालय, सोलापूर हे उपस्थित राहणार आहेत.

या प्रसंगी   दशरथ   सलगर (माजी उपाध्यक्ष रा. वि.का. सोलापूर),   भाऊसाहेब सलगर, पेनूर (माजी जि.प. सदस्य, सोलापूर) , जवाहरलाल ढोरनारे (माजी मुख्याध्यापक, लातूर),   बळीराम पनेर से.नि. शिल्पनिदेशक (आय.टी.आय.) सोलापूर, .अशोकराव कोरे (अक्कलकोट), बाळकृष्ण लिंबाजी शिंगाडे, सोलापूर, मा. श्री. शंकर कोळेकर (संस्थापक अध्यक्ष कमांडो परिवार, सोलापूर),  उत्तमराव हुडेकर (अध्यक्ष- यशवंत शैक्षणिक समिती, सोलापूर) या मान्यवरांची प्रमुख उपस्थित असणार आहे.

तरी सत्कारमूर्ती विद्यार्थी पालकांनी व समाज बंधू-भगिनीनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन यशवंत शैक्षणिक समितीचे सचिव प्रा. डॉ. नागनाथ पायगोडे यांनी केले आहे.

 
Top