उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील सैनिकी मुलांचे वसतीगृहात शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी इयत्ता दहावी, अकरावी, बारावी, ITI, पदवीका, पदवी, वैद्यकीय आणि अभियंतत्रिकी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या पाल्यांच्या (पंचवीस वर्षाच्या खालील) सैनिकी मुलांचे वसतीगृह, येथील वसतीगृह अधीक्षक  साहेबराव कुंडलिक वाघमारे यांची प्रत्यक्ष भेट घेवून अथवा मोबाईल द्वारे संपर्क करावा.प्रवेशाची अंतिम तारीख 15 ऑगस्टपर्यंत आहे, असे आवाहन जिल्हा सैंनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार यांनी केले आहे.

   नवीन आणि वसतीगृहातील जुन्या विद्यार्थीनी प्रवेशासंबधितत वसतीगृह अधीक्षक यांच्याकडे संपूर्ण कागदपत्रे जमा करावीत. वसतीगृह अधीक्षक यांचा मोबाईल क्रमांक 9767293403 आणि  पत्ता : सैनिकी मुलांचे वसतीगृह, ख्वाजानगर, धारासुर मर्दीनी मंदीराजवळ, होमगार्ड ऑफीसच्या शेजारी, उस्मानाबाद- 413501 आहे.


 
Top