उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

लातूर-टेंभुर्णी चौपदरीकरण हाती घ्यावे यासह अनेक महामार्गाच्या मागणीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक परिवहन विकास मंत्री नितीनजी गडकरी यांची खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भेट घेतली. 

मंत्री गडकरी यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गाचा आढावा घेणेबाबत राज्यातील सर्व खासदारांच्या समवेत बैठक आयोजित केली होती .या बैठकीस उपस्थित राहून धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व महामार्ग व त्याची सद्यस्थिती गडकरी यांच्या  निदर्शनास खासदार ओमराजे यांनी आणून दिली व करावयाच्या उपाययोजनेबाबत सूचना केल्या.  उमरगा ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 व   महामार्ग क्र. 63 व राष्ट्रीय महामार्ग 548 C वरील लातूर ते टेंभुर्णी रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम व   राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 येथील कामाबाबत आपल्या स्तरावरून संबंधितांना तात्काळ निर्देश द्यावे तसेच   राष्ट्रीय महामार्ग 211 मध्ये धाराशिव शहराजवळील सर्व्हिस रोड, धाराशिव पोदार स्कूल ते उपळा येथील अंडरग्राऊंड उड्डाण पूल व उड्डाण पुलावरील स्ट्रीट लाईट व  धाराशिव जिल्ह्यातील तेर - उस्मानाबाद - वैराग - अनगर - रोपाळे - पंढरपूर ह्या संत गोरोबा काका महाराज पालखी मार्गास मंजूरी द्यावी अशी विनंती खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली.

 या सर्व मागण्यांबाबत   गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन मागण्याबाबत संबंधितांना तात्काळ निर्देश दिले व ही कामे सुरू करण्याबाबत योग्य त्या सूचना वरीष्ठ अधिकारी वर्गाला  दिल्या आहेत. 

 
Top