उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भूम, वाशी, परांडा येथील शिवसैनिक कायम उध्दव ठाकरे यांच्यासोबतच आहे, असे प्रतिपादन खा. ओमराजे निंबाळमकर यांनी केले.

  गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी नंतर    जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भूम तालुका दौरा आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते.     आजच्या दौऱ्याप्रसंगी भूम तालुक्यातील बावी आणि जांब येथे शिवसैनिकाच्या वतीने निष्ठा मेळावा आयोजित केला होता याप्रसंगी बोलताना आपल्या मतदार संघातील मतदार हा सदैव निष्ठेच्या पाठीशी उभा राहणारा असून प्रलोभनामुळे पक्षाशी गद्दारी केलेल्यांना जनता कधीही माफ करणार नाही.  पक्षप्रमुख आणि या मतदार संघातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला दोन वेळेस या मतदार संघातील जनतेने मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यामुळे कठीण काळातसुध्दा पक्ष विस्तारासाठी आणि पक्षाच्या विचारांची ताकद वाढविण्यासाठी मी सदैव   पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे   यांच्या सोबत असेल, असे माजी आमदार ज्ञानेश्वर  पाटील यांनी बोलताना सांगितले.

  यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आमदार कैलास पाटील, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हाप्रमुख गौतम लटके, माजी नगराध्यक्ष नंदू   राजेंनिबाळकर, वाशी तालुका प्रमुख विकास मोळवणे, उपजिल्हाप्रमुख दिलीप शाळू महाराज उपस्थित होते.


 
Top