उमरगा/ प्रतिनिधी-

 तालुक्यातील मुळज येथील घराच्या अनाधिकृत व विना परवाना बांधकामातून उद्भवलेल्या समस्येबाबत श्रीमती सुशीलाबाई रघुनाथ बिराजदार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राहुल गुप्ता यांना निवेदन देवून सदर प्रकरणात न्याय देण्याची मागणी केली असून न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला.

  सदर प्रकरणात जबाबदार असणारे व कर्तव्यात कसूर करणारे गटविकास अधिकारी कुलदिप कांबळे यांच्या विरुद्ध नियमानुसार प्रशासकीय कारवाई अनुसरण्यात यावी व गुन्हा नोंद करण्यात यावा याबाबत १४ ऑगस्ट पर्यंत न्याय द्यावा. अन्यथा आम्ही सर्व कुटुंबिय १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र दिना दिवशी जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे आत्मदहन करणार असे निवेदनात  सुशीलाबाई बिराजदार यांनी म्हटले आहे.


 
Top