उमरगा/ प्रतिनिधी-

 वाहन चालवण्याचा परवाना घेण्यासाठी आजही मोठी कसरत करावी लागते असते. त्यात नवीन शिकावू परवाना, नूतनीकरण , नवीन वाहन नोंदणी आदी कामे ठिकाणी व्हावे यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कॅम्प चे  आयोजन करण्यात येतं. त्यात उमरगा येथील जकेकूर -चौरस्ता आर टी ओ चेक पॉईंटवर  आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी कॅम्प घेऊन वाहन संबंधित कामे केली जातात. मात्र अवजड वाहन चालकाचा परवाना घेण्यासाठी किंवा नूतनिकरन करण्यासाठी उस्मानाबाद येथे जावं लागत होतं. या कारणाने वाहन धारक चालक यांची गैर सोय होतं होती.

मात्र( ता.०२) -रोजी  कॅम्प मध्ये हेवी (अवजड वाहन परवाना करिता पहिल्यांदा टेस्ट झाली. कुलकर्णी मोटार ड्रायव्हिंग स्कूल, उमरगा यांनी ट्रक प्रशिक्षण सुरू केल्यामुळे हेवी अवजड  वाहन परवाना  उस्मानाबाद ऑफिसला जाण्याची गरज उरली नाही. आरटीओ चेक पॉइंट जकेकुर-  चौरस्ता येथे चाचणी देता येणार असल्याने वाहनचालक, वाहनमालकांची सोय झाली आहे . याप्रसंगी मोटार वाहन निरीक्षक सतीश धुंदे, YTPL चे दयानंद सर्जे तसेच पहिल्यांदा चाचणी देणारे प्रशिक्षणार्थी राजकुमार शिंदे, प्रवीण सोनकांबळे, आकाश सरवदे यांचा सत्कार कुलकर्णी मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांच्या वतीने मोहनिश कुलकर्णी व उत्कर्ष देवणीकर यांनी केला. यावेळी मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालक, वाहन चालक मालक संघटनेचे प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.


 
Top