उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या भाजपा-शिवसेना (शिंदे गट) सरकारमध्ये  परंडा-भूम-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.तानाजीराव सावंत यांची मंत्रपदी वर्णी लागल्याबद्दल धाराशिव येथे शिंदे गटातील शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे युवा सेनेचे राज्य विस्तारक तथा मा. नगराध्यक्ष सुरज साळुंके यांच्या नेतृत्वाखाली मिठाई वाटून फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. 

 महाराष्ट्रात झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांचा मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. यामध्ये परंडा-भूम-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार  प्रा.तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली युवा शिवसैनिक मोठ्या संख्येने शिंदे गटात सहभागी झालेले आहेत. आज (दि.9) जाहीर झालेल्या मंत्रिमंडळात प्रा.तानाजीराव सावंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रा.तानाजीराव सावंत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याचे वृत्त धाराशिव शहरात धडकताच शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. 

 यावेळी शिवसेनेचे युवक नेते अजित लाकाळ, नामदेव निकम, श्रीनिवास लाकाळ, नाना सूर्यवंशी, मधुकर झाल्टे, रामा घोगरे, प्रणिल रणखांब, ज्ञानेश्वर ठवरे, राहुल मोरे, आकाश माळी, महेश मगर, रणजित चौधरी, अविनाश टापरे, गगन आगलावे, सुरज राऊत, गणेश जाधव, योगेश तुपे, महेश महानवर, राकेश ठवरे, अविनाश कदम, महेश देवकते, ओंकार मैराण, बबलू वंडरे, अक्षय देवकते, सचिन मडके, दिनेश तुपे, बबलू नवले, अजय भगत, महादेव आगलावे, संतोष देवकर यांच्यासह युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेडीकल कॉलेजवर लक्ष

शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी उस्मानाबादचे मेडीकल कॉलेज या शैक्षणीक वर्षांपासून सुरू करण्यासाठी अथक परिश्रम केले. परंतु सध्या शिंदे सरकार आल्यामुळे कैलास पाटील यांच्या प्रयत्नाला खीळ बसली असल्याचे मानले जात आहे. शिंदे गटाचे भूम-परंड्याचे आमदार प्रा.तानाजी सावंत यांची मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात समावेश झाला आहे. मंत्री प्रा. तानाजी सावंत मेडीकल कॉलेज,  बसस्थानकाचे नवनिर्माण व अन्य विकास कामे कशा प्रकारे मार्गी लावतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. 

 
Top