उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा मोहीम राबवत आहे. त्याच अनुषंगाने बुधवारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातून तिरंगा बाइक रॅली काढण्यात आली. यात तरुण कार्यकर्त्यांचा अधिक सहभाग दिसून आला.

आमदार राणाजगजितसिंह पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच हर घर तिरंगा मोहिमेत सर्वांनी सहभाग घेण्यासाठी आज तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, हमारी आन बान शान तिरंगा या जय घोषाने व राष्ट्र भक्तीने संपुर्ण शहर दणाणून गेले होेते.

शहरातील भाजप प्रतिष्ठान भवन येथून रॅली सुरु झाली. आर्य समाज चौक, राष्ट्रमाता जिजाऊ चौक, महात्मा बसवेश्वर चौक, राजमाता जिजाऊ उद्यान, देशपांडे स्टॅन्ड, काळा मारुती चौक, जिल्हाधिकारी निवासस्थान, संत गाडगेबाबा चौक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरुन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या रॅलीची सांगता राष्ट्रगीत म्हणुन करण्यात आली. यात माजी जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल काकडे, इंद्रजीत देवकते, अभय इंगळे, युवराज नळे, व्यंकटेश कोरे, बापू पवार, प्रवीण पाठक आदींची उपस्थिती होती.

 
Top