उमरगा/ प्रतिनिधी-

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने उस्मानाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, कॉंग्रेसचे जेष्ट नेते मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली “आझादी गौरव पदयात्रा” काढण्यात येणार आहे. उमरगा तालुक्यातून ७५ किमी पदयात्रा जाणार असून या पदयात्रेत ठिकठिकाणी मशाल रॅली, संवाद सभा, कॉर्नर सभा, कॉर्नर बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस वतीने राज्यभर “आझादी गौरव” आयोजित करण्यात आली आहे. त्या पध्दतीने उस्मानाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, कॉंग्रेसचे जेष्ट नेते मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा तालुक्यातील तलमोड, तुरोरी, उमरगा, जकेकुर, दाळींब, येणेगूर, आष्टा मोड या गावातून शुक्रवार दि. १२ ऑगष्ट रोजी “आझादी गौरव पदयात्रा काढण्यात येणार आहे. उमरगा तालुक्यातून ७५ किमी पदयात्रा जाणार असून या पदयात्रेत ठिकठिकाणी मशाल रॅली, संवाद सभा, कॉर्नर सभा, कॉर्नर बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढयात  तसेच स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षात देशाच्या जडणघडणीत कॉंग्रेस पक्षाचा वाटा मोलाचा राहिला आहे. तसेच भारताच्या इतिहासात अनेक देशहिताचे विविध निर्णय, योजना, माहिती तंत्रज्ञान, विकासाचा आराखडा, टेक्नॉलॉजी, आदी निर्णयात कॉग्रेस पक्षाचा मोठा वाटा राहिलेला आहे. याबाबत पद यात्रे दरम्यान काॅग्रेस नेते संबोधित करणार आहेत. कॉग्रेस कमिटीच्या वतीने तयार केलेल्या चित्ररथावर देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या महापुरुषांची छायाचित्रे लावली आहेत. त्यावर “याद करो कुर्बानी” “७५वा अमृत महोत्सव” ही घोषवाक्य लिहिली आहेत. या पदयात्रेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, माजी मंत्री ज्येष्ठ नेते मधुकराव चव्हाण, जिल्हा बँकेचे चेअरमन बापूराव पाटील,  युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील, प्रदेश सचिव दिलीप भालेराव, काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, विजयकुमार सोनवणे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष संगीताताई कडगंचे आदींची उपस्थिती रहाणार आहे. या पदयात्रेचे आयोजन उमरगा लोहारा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top