उस्मानाबाद / प्रतिनिधी-

देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लादल्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. केंद्र सरकारने आता जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावल्यामुळे गोरगरीब जनता महागाईने होरपळून निघत आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात खरीप पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्‍यांना हेक्टरी 75 हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार न केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे कि अनेकशेतात पावसाचे पाणी साचले असुन ढगफुटी मुळे जमिनीतील माती वाहुन गेली आहे अनेक बेरोजगाराना काम नाही त्यात पुन्हा डिझेल पेट्रोल  सहवाढती महागाई यामुळे जनता ञस्त आहे जीएसटी मुळे तर सामान्य जनता महागाईने होरपळून निघत आहे. त्यामुळे जीएसटी कर तात्काळ हटविण्यात यावा.यासह महागाई कमी करण्यासाठी पेट्रोल  डिझेल दर कमी करा   अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. 

मागण्यांचा विचार न झाल्यास जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड.धीरज पाटील, राजाभाऊ शेरखाने,  खलील सय्यद,  प्रशांत पाटील, लक्ष्मण सरडे, विलास शाळू,  महेबूब पटेल, पांडुरंग कुंभार,  अग्निवेश शिंदे, दादा पाटील, अ‍ॅड. जावेद काझी,  आयुब पटेल,  सिद्धार्थ बनसोडे,  अ‍ॅड.विश्वजित शिंदे, काका सोनटक्के,  धनंजय राऊत,  प्रभाकर लोंढे, आनंदराव घोगरे, कफिल सय्यद, सुभाष हिंगमिरे, अवधूत क्षीरसागर, प्रभाकर डोंबाळे, अभिमान पेठे, संजय गजधने, शैलेश देव, सलमान शेख, अशोकराव बनसोडे, आरेफ मुलाणी, लियाकत मोमीन, अज्जू शेख, स्वप्नील शिंगाडे, महादेव पेठे, भारत काटे, मुख्तार शेख, सचिन धाकतोडे, बालाजी नायकल, बप्पा खोत, खय्युम सय्यद, अलताफ मुलाणी, अभिजित देडे, अ‍ॅड.राहुल लोखंडे, प्रेमानंद सपकाळ, समाधान घाटशिळे यांच्यासह इतर काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची स्वाक्षरी आहे.

 
Top