परंडा /प्रतिनिधी :- 

भारत स्वतंत्र करण्यासाठी ज्या महापुरुषांनी आपले बलिदान दिले त्यांच्या योगदानामुळे आज आपण स्वतंत्रपणे जीवन जगत आहोत. तेव्हा आपण त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवून देशा प्रती आदर बाळगावा व महापुरुषांचे विचार आत्मसात करावे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सुनिल जाधव यांनी केले.

 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयामध्ये १५ ऑगस्ट स्वतंत्रता दिन मोठ्या उत्साहात साजरा व विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे, आय क्यू एसी चे चेअरमन डॉ महेशकुमार माने, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा दत्तात्रेय मांगले, प्रा संभाजी धनवे, प्रा एस के गायकवाड, प्रा दत्तात्रेय मुळीक, कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब दिवाने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले . कार्यक्रमास महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ भागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ कृष्णा परभने, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी करून आभार व्यक्त केले.


 
Top