उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हा वीटभट्टी चालक युनियनच्या अध्यक्षपदी प्रशांत साळुंके यांची फेरनिवड करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्हा वीटभट्टी चालक युनियनची बैठक रविवार, 31 जुलै रोजी शासकीय विश्रामगृहात पार पडली. बैठकीत युनियनची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर वीटभट्टीमध्ये तयार झालेल्या विटांच्या विक्री दरासह मजुरी व इतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

सध्या वाढलेली महागाई, शासनाचे धोरण आणि इतर समस्यांमुळे वीटभट्टी उद्योग अडचणीत सापडलेला आहे. त्यावर चर्चा व विचारविनिमय करुन वीटभट्टी उद्योगाला चालना मिळावी याकरिता जिल्हा वीटभट्टी चालक युनियनचे अध्यक्ष प्रशांत (बापू) साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दुपारी जिल्ह्यातील वीटभट्टी चालकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत वीटभट्टी चालकांनी उद्योगासमोर असलेल्या अडचणी मांडल्या. त्याचबरोबर वीटभट्टी कामगारांचा विमा काढणे, सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात कामगारांच्या नोंदी करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच वीटभट्टी चालक-मालकांची पतपेढी स्थापन करण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला.

त्यानंतर युनियनची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी प्रशांत बिभीषण साळुंके यांची फेरनिवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी शौकत शेख, सचिव सत्तार कुरेशी तर सदस्यपदी सदस्य चंद्रकांत कणे, रामकृष्ण पाटील, मोबीन खान, मेहबुब बागवान, मनोज घोगरे, पांडूरंग पाटील, सलमान अय्याज मुल्ला, अलिमोद्दीन शेख, शाम राठोड, राजेंद्र सूर्यवंशी, हुसेन सास्तुरे, सचिन कळमकर, राम माने, ताराचंद जाधव यांची निवड करण्यात आली.

   या बैठकीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील वीटभट्टी चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीचे आभार सत्तार कुरेशी यांनी मानले.


 
Top