लोहारा/प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोहारा तहसील कार्यालयात   प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम PMEGP व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम CMEGP अंतर्गत प्रस्ताव नोंदणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, पं.स.माजी सदस्य वामन डावरे,पी.एस.तांबारे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाठ, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, बाळु देवकर, महादेव कोरे, कल्याण ढगे, नितीन दंडगुले, संतोष दंडगुले आदी उपस्थित होते.


 
Top