तुळजापूर /प्रतिनिधी

तिर्थक्षेञ तुळजापूराला चोरीची गाडी घेवुन आलेल्या  तीन जणांना   पोलिसांनी सापळा रचुन  ताब्यात घेतले.या तिघांना सोमवार दि.२५रोजी तुळजापूर न्यायालयासमोर उभे केले असता न्यायमुर्तीनी त्यांना न्यायालीयन कोठडी सुनावलीआहे.

 या बाबतीत अधिक माहीती अशी की, जितसिंग राजपालसिंग टाक, लकिसिंग गब्बरसिंग टाक  व निहालसिंग मन्नूसिंग टाक    हे गुन्हा करण्याच्या उद्देशाने िफरत असताना तुळजापूर शहरातील डुल्या हनुमान मंदीर जवळ मिळुन आले.  यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडुन स्कार्फियो गाडीसह गाडीतील 

कुकरी   तलवार , दोन कटावण्या, दोन मारटुल, एक लहान धारधार कटर, मोबाईल  सह 358700रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात  पोना सचिन राऊत यांनी दिलेल्या फिर्यादवरुन तुळजापूर पोलिस ठाण्यात   गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्या  तिघांना सोमवारी दुपारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीशांनी त्यांना एमसीआर सुनावली आहे. 

 
Top