तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील मंगरुळ स्थित  कंचेश्वर शुगर लि , मंगरुळ साखर कारखाना येथे सोमवार  दि . २५  रोजी गाळप हंगाम २०२२-२३ या हंगामासाठी मिल रोलरचे पूजन कारखान्याचे चेअरमन  धनंजय भोसले   यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता १०० / - प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती चेअरमन  धनंजय  भोसले साहेब यांनी दिली

 यावेळी कारखान्याचे व्हा . चेअरमन पृथ्वीराज माने साहेब , मुख्य कार्यकारी अधिकारी संजीवकुमार जाधव साहेब , जनरल मॅनेजर ( ॲग्री ) बाराते   , चिफ इंजिनीअर क्षीरसागर   , चिफ केमिस्ट साळुंके   , डिस्टलरी मॅनेजर हायकर  तसेच सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते .


 
Top