लोहारा/प्रतिनिधी

उमरगा व लोहारा शहरातील रस्ते, गटारी, लोहारा नगर पंचायतीची इमारत बांधकाम आदी विकासकामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडुन २० कोटी रुपयांचा निधी मंजुर करून घेतल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे.

 या निधीतून उमरगा शहरातील प्रभाग क्र.१ मध्ये  १) राष्ट्रीय महामार्ग ते महादेव मंदिर २) राष्ट्रीय महामार्ग ते डॉ.के.डी.शेंडगे इंग्लिश स्कुल, ते बायपास प्रभाग क्र.२ मध्ये १) राष्ट्रीय महामार्ग ते शिवाजी चौक ते गणेश मंदिर २) माशाळकर गोदाम ते इंदिरा चौक प्रभाग क्र.१० मध्ये १) विपुल व्हर्टेक्स ते दिलीप बिराजदार घर २) राष्ट्रीय महामार्ग मुरूमकर किराणा ते शिरगुरे किराणा दुकानं पर्यंत ३) शिवपुरी रोड ते शिरगुरे किराणा ते पतंगे रोड पर्यंत प्रभाग क्र.९ मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय ते पतंगे रोड रस्ता प्रभाग क्र.६ मध्ये १) राष्ट्रीय महामार्ग ते आईसाहेब मंगल कार्यालय पर्यंत यासह प्रभाग क्र.६, ७ प्रभाग क्र.९ व प्रभाग क्र.१२ मध्ये विविध ठिकाणी रस्ते / गटारी करण्यासाठी एकूण १० कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. तसेच लोहारा शहरात लोहारा नगर पंचायतीची सर्व सुविधांयुक्त सुसज्ज इमारत बांधणे - ५ कोटी रु., ग्रामीण रुग्णालय ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत दोन्ही बाजूने नाला करणे २ कोटी रु., एम.आर.एफ. शोरूम ते जट्टे पेट्रोल पॅम्पपर्यंत बंदिस्त सिमेंट नाला करणे, यासह प्रभाग क्र.१३, प्रभाग क्र.१४, प्रभाग क्र.९ मध्ये व विविध ठिकाणी सिमेंट रस्ता व नाली करणे या कामांसाठी एकूण १० कोटी रु. निधी मंजुर झाला आहे.  सदर कामांसाठी निधी मंजुर केल्याबद्दल आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.


 
Top