परंडा / प्रतिनिधी-

येथील जिल्हा परिषद प्रशाला व कन्या प्रशाला  येथील इयत्ता १० वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा परंडा सेवा मंडळातर्फे सोमवारी (दि.१८) रोजी सत्कार करण्यात आला

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर लोखंडे यांनी केले.शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या जयंत पाटील व रविंद्र महाजन यांनी परंडा सेवा मंडळाची माहिती देत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत प्रशाले बद्दल गौरो उदगार काढले. इयत्ता १० वी मध्ये दोन्हीं प्रशालेतील प्रथम व द्वितीय आलेले विद्यार्थी साक्षी रामेश्वर जाधव,मयुरी दत्ता गटकूळ,अरबाज खान , कलिम शेख यांचा प्रथम क्रमांकासाठी प्रत्येकी २००० व द्वितीय क्रमांकासाठी १००० रुपये तसेच प्रमापत्र देऊन गौरविण्यात आले.

 कल्याणसागर समुहाचे मार्गदर्शक विकास कुलकर्णी आनंद खर्डेकर ,अब्दुल हंनुरे , रामचंद्र इंगळे दिनकर पवार यांनी मनोगत व्यक्त केले.  या कार्यक्रमास घनशाम शिंदे ॲड सुनील काळे आनंद देशमुख सतीश संगमनेरकर महादेव विटकर  नामदेव पकाले बबन गवळे दिनकर साबळे कालिदास झीने आबासाहेब माळी चंद्रकांत सुरवसे तानाजी मिसळ बाबुधी घाडगे नारायण शिंदे मिनाक्षी मुंडे उपस्थीत होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन सतिश खरात यांनी केले

 
Top