तुळजापूर / प्रतिनिधी- 

 श्रीतुळजाभवानी मंदीरात जात असताना गर्दीचा फायदा घेवुन उस्मानाबाद येथील भाविकाच्या खिशातील 22 हजार रुपये लंपास केल्याची घटना शुक्रवार दि. १५रोजी दुपारी २.१५वा. घडली.

 याबाबतीत अधिक माहीती अशी की, उस्मानाबाद येथील बार्शी रोडवर राहणारे दत्तु कुलकर्णी हे श्री तुळजाभवानी मंदीरात दर्शनासाठी गेले असता गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने कुलकर्णी यांच्या  िशातील २२,००० ₹ रोख   रक्कम त्यांच्या नकळत चोरुन नेली . अशा दिलेल्या फिर्याद वरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांन विरोधात तुळजापूर पोलिस ठाण्यात गुरंन 225/22कलम भादंवी 379अन्वय गुन्हा नोंद केला आहे. 


 
Top