तुळजापूर / प्रतिनिधी- 

शहरातील नळदुर्ग रोडवर असणाऱ्या आयडीबिआय बँकेचे एटीएम मशीन फोडुन लुटण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केल्याची घटना शुक्रवार दि. १५रोजी पहाटे ३.३०वा. दरम्यान  घडली.

  थोडक्यात हकीकत अशी की, पहाटे सुमारास सामसुम असल्याच्या पार्श्वभूमीवर  अनोळखी दोन व्यक्तींनी हातोडी व छन्नीच्या सहाय्याने नळदुर्ग रोड , तुळजापूर येथील आयडीबीआय बँकेचे एटीएम मशीनमधील पैसे घेउन जाण्याचा प्रयत्न केला . अशा मजकुराच्या आयडीबीआय बँकेचे कर्मचारी शशीन राव यांनी दिली. यावरुन पोलिसांनी  तुळजापूर पोलिस ठाण्यात गुरंन २५६/२२कलम भादंसंं ३७९अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


 
Top