उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी कळंब तालुक्यातील डिकसळ येथे छापा टाकून २४ हजार २४० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखचे पथक गस्तीदरम्यान डिकसळला आले असता गोपनीय माहितीवरुन किसन माधव गायकवाड (६५) यांच्या दुकानावर छापा टाकाला. तेव्हा प्रतिबंधीत गुटखा व सुगंधीत तंबाखू असा एकुण २४ हजार २४० रुपयांचा माल आढळला. ही कारवाई पथकाचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, रवींद्र आरसेवाड, सहाणे यांच्या पथकाने केली आहे.


 
Top