तुळजापूर  /प्रतिनिधी

 तालुक्यातील सावरगाव येथील  श्री नागनाथ मंदीरात  नाग पाल विंचू नागपंचमी दिनी ऐकञित येणारी नागनाथ महाराजांची याञा १व२आँगस्ट रोजी  संपन्न होत असुन या पार्श्वभूमीवर सोमवार (दि.२५) रोजी नागनाथ मंदिरात आढावा बैठक पार पडली, 

गेल्या दोनवर्षात कोरोना महामारीमुळे  नागनाथ महाराज यात्रा साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली होती ,परंतु यावर्षी कोरानाचे नियम शिथिल करण्यात आल्याने नागनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त नागपंचमी दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्याने यादरम्यान भाविकांना सुख सुविधा देण्यासाठी उपाययोजना राबविण्या संदर्भात आणि यात्रा काळात कसलाही अनुसूचित प्रकार घडू नये , तसेच यात्रा काळात पोलीस बंदोबस्ताच्या दृष्टिकोनातून बॅरिगेटिंग व्यवस्था ,पार्किंगचे नियोजित ठिकाण ,वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी रस्ते मोकळे करणे ,यात्रा परिसरात वाहनांना बंदी यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली, यात्रेदरम्यान १ ऑगस्ट ते २ ऑगस्ट या दरम्यान दोनदिवस  मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून यात्रेत कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी तामलवाडी  पोलीस प्रशासन सतर्क राहणार असल्याचे यावेळी सपोनि सचिन पंडित यांनी सांगितले.

यावेळी माजी जि प सदस्य राजकुमार पाटील, सरपंच रामेश्वर तोडकरी, मंदिराचे मुख्य पुजारी कल्याण स्वामी, सामाजिक कार्यकर्ते रमेश काडगावकर,ग्राप सदस्य रंगनाथ डोलारे, रामभाऊ पाटील,प्रा. कानिफनाथ माळी, हनुमंत गाभणे, नंदकुमार पाटील,सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गाभणे,दिलीप स्वामी,रमेश लिंगफोडे,यादव माळी, चांदपाशा सय्यद,दादासाहेब काडगावकर, सत्यवान सुरवसे,अच्युत माळी ,नागेश कुंभार ,यादव माळी ,सागर स्वामी ,सुरज ढेकणे, सह  गावातील विविध मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते....!


 
Top