उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयांतर्गत मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रद्वारा उस्मानाबाद येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि. 11 जुलै 2022 रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

    या भरती मेळाव्यास औरंगाबाद आणि पुणे येथील नामांकित कंपन्या उपस्थित राहणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांपैकी ज्या प्रशिक्षणार्थ्यांना अद्याप शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) मिळालेली नाही, त्यांनी दि.11 जुलै रोजी सकाळी 10.00 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे उपस्थित राहून या भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा. तसेच या भरती मेळाव्यास उपस्थित राहताना राज्य शासनाने कोविड-19 च्या संदर्भात दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करावे, असे आवाहन संस्थेचे अंशकालीन प्राचार्य सोमेश्वर वाघमारे तसेच सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार अजय त्रिचुरकर यांनी केले आहे.

 
Top