तुळजापूर /प्रतिनिधी- 

 तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह परिसरात  रविवार दि.१० रोजी  एकादशी सोहळा पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मस्तकी श्री विठ्ठलाचा टिळा काढण्यात आला होता. आज देविजींना उपवासाचा फराळाचा पदार्थांचा नैवध दाखविण्यात आले.

कासार गल्लीतील व श्रीतुळजाभवानी मंदीरातील श्री विठ्ठल-रखुमाई मंदीरात भाविकांनी दर्शनार्थ मोठी गर्दी केली होती.आषाढी एकादशी पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रखुमाईसह शंभु महादेव मंदीरानमध्ये भजन किर्तन धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. आषढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देवीदर्नशनार्थ वारक-यांनी गर्दी केली होती.

 आषाढी एकादशी सोहळ्यात जाणाऱ्या व सोहळा संपताच परत येणाऱ्या वारकरी  भाविकांनी गेली दोन दिवसापासुन देवीदर्नशनार्थ गर्दी करीत  आहे. या वारकरी भाविकांचा तिर्थक्षेञी वावर गुरु पोर्णिमा पर्यत असणार असल्याने एकादशी ते पोर्णिमा या कालावधीत तिर्थक्षेञी माऊली व भवानी मातेचा गजर जागर होणार आहे.


 
Top