उमरगा/ प्रतिनिधी-

 तालुक्यातील बाबळसूर येथील श्री मथुरापुरी मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री विठ्ठल पुरी महाराज यांचे (दि २२) शुक्रवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास देहावसान झाले.

  श्री मथुरापुरी मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री विठ्ठल पुरी महाराज यांचे अल्पशा आजाराने देहावसान झाले भारतातील जे चार प्रमुख पीट आहेत त्या चार प्रमुख पीठात  पुरी गिरी भारती आणि बन त्यापैकी पुरी पिठाचे देवस्थान उमरगा तालुक्यातील  बाबळसुर येथे श्री मथुरा पुरी महाराजांच्या नावे प्रचलित आहे हे बाबळसुरवाशी यांचे ग्रामदैवत आहे आणि श्रद्धास्थान आहे या मठाचे महंत श्री विठ्ठल पुरी महाराज हे लहानपणापासून या मठाच्या  महंताच्या सहवासात आले आणि या संसारात राहून आपले जीवन घालवण्यापेक्षा महन्तच्या संगतीत राहून आपल्या आयुष्याचे सार्थक करावी ह्या हेतूने लहानपणीच त्यांनी दीक्षा घेतली त्यावेळी बाबळसुर मठा चे महंत परमपूज्य माधवपुरी होते त्यांच्या सहवासात राहून महाराजांनी ईश्वर सेवा सुरू केली बऱ्याच जणांचे मत्रपुरी महाराज हे कुलदैवत आहे या माधव महाराजांचे देहावसान झाल्यापासून महंत म्हणून विठ्ठल माधवपुरी या नावाने मठाची गादी सांभाळली काही दिवसापासून त्यांना श्वसनाचा त्रास जाणू लागला औषधोपचार चालू असतानाच वयाच्या ७० व्या वर्षी त्यांची देहवासना झाली त्यांच्या अंत्य दर्शनासाठी पंच क्रोशीतील भाविक भक्तांनी गर्दी केली होती.

 
Top