लोहारा/प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील वि.का.से.सह. सोसायटीवर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व 13 उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

सदर संस्था ही नफ्यात असून संस्थेची आजरोजी 47 लक्ष इतकी मुदत ठेव असून, संस्थेने 2018 व 2020 मध्ये सभासदांना वाढीव कर्जवाटप केलेले असून, लाभांश सुद्धा वाटप केलेले आहे. नवनिर्वाचित सदस्य म्हणून 1) अजय पाटील 2)आप्पाराव कुर्ले 3)रणजित पाटील 4)मंजूर शेख 5) मल्लिनाथ मिटकरी 6) रामेश्वर पवार 7) शामकांत हासुरे 8) प्रेमनाथ शिंदे 9)मल्लिनाथ माळी 10)बाबासाहेब चिवरे 11)मारुती कोकणे 12)सौ.रंजना दिलीप बेंडगे 13)सौ.वंदनाबाई कमलाकर पवार, यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


 
Top