तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर खुर्द येथील तुळजाई सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर साबळे तर उपाध्यक्ष पदी सूरज जगदाळे यांची निवड झाली आहे. यावर्षी गणेशोत्सवात सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

मंडळाचे ज्येष्ठ सदस्य माजी नगरसेवक पंडितराव जगदाळे व तुळजाई पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र देशमाने यांचा उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी सचिवपदी श्रीनिवास मुळे, सहसचिव विकास भोजने तर कोषाध्यक्षपदी श्याम माळी यांची निवड झाली. बैठकीला अजय देशमाने, हनुमंत साबळे, बालाजी देशमाने, प्रमोद भोजने, विशाल क्षीरसागर, मनोज देशमाने, राज क्षीरसागर, मयूर साबळे, दादा व्हटकर, दयानंद जगदाळे, प्रवीण उंडरे, प्रतीक जगदाळे, वैभव लोले, प्रसाद उंडरे, सुशांत साबळे, संकेत नाईक, मन्सूर शेख, अक्षय ठेले, गुरु कुंभार, विजय मोरे, अलीम शेख, संकेत भोजने, आदित्य व्हटकर, बाळू शेरेकर, सूरज लोले आदी उपस्थित होते. 

 
Top